श्री.ह.भ.प.सोमनाथ महाराज पाटील हे नवीन पिढीतील शास्त्रशुद्ध कीर्तनकारांपैकी एक.
कीर्तनासोबत श्रीमद्भागवत , रामायण ,संतकथा व शिवमहापुराणादी कथांच्या माध्यमातून ते आध्यात्मिक ग्रंथ व संतविचार लोकांपर्यंत पोहचवण्याचे सत्कार्य करतात.
महाराजांचा जन्म नेवासा तालुक्यातील ‘पाथरवाला’ या गावी एका शेतकरी कुटुंबात झाला.आई वडील दोन्ही पारमार्थिक.लहानपणापासुनच महाराजांना परमार्थाचा छंद जडला.
पैठण येथील गीता भवन याठिकाणी प्रारंभीक शिक्षण घेतले.नंतर आळंदी येथील स्वानंद सुखनिवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कीर्तनाचे प्रशिक्षण घेतले.या काळात मधुकरी मागुन जिवन व्यतीत केले.
सांप्रदायिक ग्रंथ साधना,महात्म्यांची सेवा,अभ्यासू वृत्ती व चिकाटी या सद्गुणांमुळे महाराष्ट्रभर सेवा करण्याची संधी महाराजांना प्राप्त झाली. आपल्या सुस्वभावामुळे अनेकांना त्यांनी सन्मार्गास प्रवृत्त केले.
श्री.ह.भ.प.सोमनाथ महाराज पाटील यांना भावी पारमार्थिक आयुष्यासाठी खुप खुप शुभेच्छा…