Kalnirnay Rashi Bhavishya October 2022 – कालनिर्णय राशी भविष्य ऑक्टोबर २०२२

Aries/मेष Mesh Rashi in Marathi October 2022

Aries/मेष Mesh Rashi in Marathi - aries sign in marathi

Aries Mesh Rashi Kalnirnay Rashi Bhavishya

Mesh Rashi October 2022 in Marathi

राहु-हर्षल प्रथम, मंगळ द्वितीय, मंगळ पराक्रम, रवि-बुध-शुक्र षष्ठ, रवि-बुध-शुक्र-केतु सप्तम, शनि-प्लुटो दशम, नेपच्यून लाभ, गुरु व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. आपल्या आशावादी विचारसरणीमुळे कसोटीच्या क्षणाचा सामना करण्याचे मनःसामर्थ्य दाखवाल.

आपण आखलेली कामे चोख बजावाल. कामाधंद्यात यश प्राप्त होईल. स्वत:च्या जबर महत्त्वाकांक्षेवर अंकुश ठेवावा. नवे मार्ग दृष्टी पथात येतील. स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतः पूर्ण करा, अपेक्षित यश मिळेल.

अनावश्यक खर्च टाळणे म्हणजे एकप्रकारची बचत होय. परिस्थितीला अनुसरून आर्थिक धोरण आखणे जरूरीचे आहे. मित्रपरिवारात उधार उसनवार करण्याचे टाळा. अशामुळे कटु भावना निर्माण होतील.

देण्याघेण्याचे व्यवहार सावधानतेने करा. जरूरी पडल्यास वरिष्ठांची मदत घ्या. मुलांच्या आहारा-विहाराबाबत जागरूक राहा. भावंडांशी नातेसंबंध सुधारा. कुटुंबात खेळीमेळीचे वातावरण ठेवा.

आपल्या जवळच्या माणसांसाठी वेळ काढा. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करावेत. अपयशाकडे सकारात्मक दृष्टिने पाहा. निराशा टाळा. नशीबाला दोष देण्याचे टाळा. अभ्यासातील खाचखळगे ओळखा. वाचनाची आवड लावा. बोलण्यामध्ये मधूरता ठेवा. प्रिय व्यक्तीच्या भावनांचा आदर करा. प्रेमसंबंधातील येणाऱ्या अडचणींच्या परिस्थितीस सामना करण्याचे धाडस दाखवा.

भेटवस्तू देऊन आपल्या प्रिय व्यक्तीस खूष ठेवा. पतीपत्नीनी किरकोळ गोष्टीवरून वाद घालणे टाळावे. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सर्वाना आदरयुक्त वागणुक दिल्यास त्याची परतफेड आपल्याला निश्चित मिळेल.

वेळेचे अपव्यय करू नका. संयम, प्रयत्न, कृती यांची सांगड घालून परिस्थितीवर नियंत्रण ठेवा. रागावर संयम ठेवा. वाहन चालवताना तसेच साहस पराक्रम करताना सावध राहा, समाजात मान मरातब वाढेल. भाग्य तुमच्या बाजुने आहे, प्रयत्नात कसूर करू नका.

Taurus/वृषभ Vrishabha Rashi in Marathi October 2022

Taurus/वृषभ Vrishabha Rashi in Marathi - taurus sign in marathi

Taurus Vrishabha Rashi Kalnirnay Rashi Bhavishya

Vrishabha Rashi October 2022 in Marathi

मंगळ प्रथम, मंगळ द्वितीय, रवि-बुध-शुक्र पंचम, रवि-बुध-शुक्र-केतु षष्ठ, शनि-प्लुटो नवम, नेपच्यून दशम, गुरु लाभ, राहु हर्षल व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. दिलेला शब्द पाळण्यास विसरू नका. सारासार विचार करून कृती करा.

सुखी आयुष्यासाठी, वेळेचा निव्वळ व्यय करणाऱ्या हट्टी स्वभावाचा त्याग करा. जुनाट व्याधी असल्यास त्यावर कायमस्वरूपी इलाज करावयास हवा. आरोग्य राखण्यासाठी कामामधून वेळ काढा व व्याधी निवारण करा.

आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे महत्वाचे ठरेल. तसे न झाल्यास नुकसान होण्याची शक्यता दिसते. आर्थिक बाबीसाठी घरातील सदस्यांचा सल्ला फायदेशीर होऊ शकतो.

असे सल्ले विचारात घेणे योग्य ठरेल. घरातील ज्येष्ठांच्या सल्ल्याने महत्वपूर्ण निर्णय घ्या. मुलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. स्वत:च्या बोलण्यामुळे व्यक्ती संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्यावी.

शत्रू विरोधकांवर नजर ठेवा. आपल्या अभ्यासशैलीत आवश्यक तो सुधार करा. मनाची एकाग्रता साधण्याचा प्रयत्न करा. अचूक निर्णयक्षमतेचा विकास करण्यावर भर द्या. विद्यार्थ्यांनी मनावर संयमाचा अंकुश ठेवावा.

पालकांच्या मनास समाधान देण्याचे धोरण ठेवा. खेळण्यात वेळेचा अपव्यय करू नका. प्रेमाचा अतिरेक होणार नाही याकडे लक्ष ठेवा. वेळेचे बंधन पाळा. प्रेमसंबंधात एकमेकांवर विश्वास ठेवा. सामंजस्याचे धोरण ठेवा.

प्रिय व्यक्तीचा विश्वास संपादन करा. वैवाहिक जीवनात एकमताने काम करा. आपल्या संभाषणातून आपल्या जोडीदारास सुखसमाधान मिळेल याकडे विशेष लक्ष पुरवा. जोडीदारावर आपली पते लादू नका.

नोकरीत चातुर्याचा वापर करा. व्यावसायिक प्रगतीचा वेग कायम ठेवणे अवघड वाटले तरी नियोजन कौशल्यामुळे आपणास शक्य होईल. राग आल्यावर थोडं थांबलं आणि चूक झाल्यावर थोडं नमलं तर जगातल्या सर्व समस्या दूर होतात.

Gemini/मिथुन Mithun Rashi in Marathi October 2022

Gemini/मिथुन Mithun Rashi in Marathi - gemini moon sign horoscope today

Mithun Rashi Kalnirnay Rashi Bhavishya

Mithun Rashi October 2022 in Marathi

मंगळ प्रथम, रवि-बुध-शुक्र चतुर्थ, रवि-बुध-शुक्र-पंच नेपच्यून नवम गुरु दशम, राहु-भ व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. आयुष्यात कोणी नसते फक्त विचार सकारा पाहिजेत.

आरोग्यासाठी बाहेरील पदार्थ वर्ज्य करा, घरगुती जेवणावर भर द्या. आरोग्यविषयक काही शस झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कुरियन आपलेसे करून पुढे वाटचाल करा.

हट्टी स्वभावाच्या समजून न्यायचा वापर करा. तुमच्या उदार वागणुकीचा तुमचे नातेवाईक विनासायास फायदा घेण्याची आहे म्हणून करा अन्यथा तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे.

उदार वागणूक ही काही मर्यादित हे तुम्ही लक्षात ठेवा. पण मयदिच्या बाहेर जाऊन तुम्ही औदार्य दाखवाल तर त्यामुळे तुम्ही अडचणीत सापडू शकता. अर्था राहील. उपोषणास संयम घालावयास हवा.

क करताना स्वतःची विवेकबुद्धी वापरा, गरजेपेक्षा प्रेमाबद्दल कोणतीही शंका ना परस्परांविषयी प्रेमभाव जागृत करा, सलोखा प्रिय व्यक्ती गोडीगुलाबीचे धोरण ठेवा. जीवनसाथीचे प्रश्न सोड प्राधान्य द्या.

वैवाहिक जोडीदाराबरोबर प्रेमाने स्थानाची योग्य ती जाग करून द्या. त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाका, नोकरीबाबत नवा मार्ग यशदायक ठरेल. हाती घेतलेले पूर्ण होईल. आपल्या नोकरीत स्थिरता ठेवा.

आपल्या वरिष्ठांच्या मनाप्रमाणे वागा. मनातील संकल्प पूर्ण करा. आपली व्यावसायिक वृत्तीने धंद्यातील लाभाचे प्रमाण वाढविता येईल, व्यवसायात योग्य अशी जाहिरात धंदा वाढविण्यास मदत करील. आपल्या प्रगतीचा आलेख उंचावेल. विरोधकांना नामोहरम करण्यात यश मिळेल.

Cancer/कर्क Kark Rashi in Marathi October 2022

Cancer/कर्क Kark Rashi in Marathi - cancer sign in marathi

Kark Rashi Kalnirnay Rashi Bhavishya

Kark Rashi October 2022 in Marathi

रवि-बुध-शुक्र पराक्रम, रवि-बुध-शुक्र-केतु चतुर्थ, शनि-प्लुटो सप्तम, नेपच्यून अष्टम, गुरु नवम, राहु-हर्षल दशम, मंगळ लाभ, मंगळ व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. गरज नसलेले कोणत्याही विचारांना थारा देऊ नका.

शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल. आपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरूस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. आयुष्य खूप सुंदर आहे.

यामुळे जे आपल्याशी चांगले वागतात त्यांना धन्यवाद म्हणा आणि जे लोक वाईट वागतात त्यांना मोठया मनाने माफ करा. कुटूंबातील एकोपा जपण्याकडे लक्ष द्या. घरात व बाहेर दोन्ही आघाडयांवर धैर्याने तोंड द्यावे लागेल.

तुमच्या संततीची विशेष काळजी घ्या. त्यांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. विद्याभ्यासातील योग उत्तम जरी असले तरी मेहनत ही घ्यावीच लागेल. विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक क्षेत्रात जास्त भर द्यावा.

अपयशाकडे सकारात्मक दृष्टिने पहावयास हवे. आपल्या अभ्यास शैलीत आवश्यक तो सुधार करा. कुटूंबातील आर्थिक जबाबदाऱ्या सर्वांमध्ये वाटून घेणे गरजेचे राहील. अडकलेल्या पैशासाठी वारंवार संबंधित व्यक्तीस आठवण करणे हितावह आहे.

आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात तणाव आणू नका. प्रिय व्यक्तिचे मन जिंकण्याचा प्रयत्न करा. प्रिय व्यक्तिसाठी वेळ देण्याचे भान ठेवा, अन्यथा नाराजीचे सूर कानावर पडतील.

पतीपत्नी मधील वाद उघड्यावर आणु नका. जीवनसाथीचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्या. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. वैवाहिक जीवनात रस उत्पन्न करण्याचा प्रयत्न करा. वैवाहिक जीवनात एकदिलाने काम करा.

नोकरीत थोडी तणावाची परिस्थिती राहील. आपल्या नोकरीत स्थिरता ठेवा. कामातील अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करा. आपल्या व्यापारात भर कशी पडेल याची योजना आखा, व्यवसायात नियमांचे काटेकोर पालन करा.

Leo/सिंह Singh Rashi in Marathi October 2022

Leo/सिंह Singh Rashi in Marathi - leo moon sign horoscope today

Leo Rashi Kalnirnay Rashi Bhavishya

Singh Rashi October 2022 in Marathi

See also  Ekadashi March 2024

रवि-बुध-शुक्र द्वितीय, रवि-बुध-शुक्र-केतु पराक्रम, शनि-प्लुटो षष्ठ, नेपच्यून सप्तम, गुरु अष्टम, राहु-हर्षल नवम, मंगळ दशम, मंगळ लाभस्थानातून भ्रमण करणार आहेत. तुमच्या भावनांना रोखा आणि कोणतेही बेजबाबदार कृत्य करू नका ज्यामुळे भविष्यात तुम्हाला पश्चात्ताप करण्याची वेळ येईल.

तुमची बलस्थाने कोणकोणती आहेत याचा आढावा घ्या आणि भविष्यातील तुमच्या योजना आखा. तुम्हाला आनंद देतील अशा गोष्टी करा. तुम्ही ज्या गोष्टी करीत नाही त्या गोष्टी करण्यासाठी इतरांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका.

तुमच्या व्यक्तिमत्त्वात सुधारणा घडविण्यासाठी योग्य ते बदल करा. केवळ सकारात्मक विचारसरणी अवलंबिल्यामुळे कोणत्याही समस्येशी दोन हात करू शकाल, आरोग्यविषयक प्रश्न है कायमच सीमारेषेवर उभ असतात. म्हणूनच नियमित व्यायाम हे आपले रूटीन बनवा.

वेगाला अटकाव हा कधीही उपचारापेक्षा श्रेष्ठ असतो. गुंतवणूक करण्यापूर्वी त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ला जरूर ऐकावा पण अंमलात आणण्यापूर्वी स्वतःच्या क्षमतेचा विचार करावा. कष्टपूर्वक अभ्यास करणाऱ्यांस उत्तम यश मिळणार आहे.

प्रेमबंधनात असल्यास एकमेकांची मने जाणून घेण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधात एक दुसऱ्याचे सहकार्य महत्वाचे होईल. जोडीदारांबरोबर होणारे वादाचे विषय टाळा. वैवाहिक जीवनात आलेल्या व्यत्ययात मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा लागेल.

वैवाहिक सौख्य टिकवून ठेवा. संततीविषयक महत्वाचे निर्णय तातडीने घ्यावेत. मुलांना स्वत:वर पूर्ण विश्वास ठेवायला शिकवा. मुलांची जिज्ञासू व शोधकवृत्ती वाढवा वडीलधाऱ्या मंडळीकडे लक्ष द्या.

बोचरी टिका टाळणे हितावह ठरेल. नोकरीतील आपले स्थान बळकट करण्याचे प्रयत्न करा, नौकरीतील जबाबदारी वाढेल. नोकरीत चातुर्याचा वापर करा, व्यावसायिक प्रगतीचा वेग कायम ठेवणे अवघड वाटले तरी नियोजन कौशल्यामुळे आपणास शक्य होईल.

व्यवसायाच्या क्षेत्रात अचानक काही बदलाचे संकेत आहेत.

Virgo/कन्या Kanya Rashi in Marathi October 2022

Virgo/कन्या Kanya Rashi in Marathi

Kanya Rashi Kalnirnay Rashi Bhavishya

Kanya Rashi October 2022 in Marathi

रवि-बुध-शुक्र प्रथम, रवि-बुध-शुक्र-केतु द्वितीय, शनि-प्लुटो पंचम, नेपच्यून षछ, गुरु सप्तम, राहु-हर्षल अहम, मंगळ नवम, मंगळ दशमस्थानातून भ्रमण करणार आहेत.

कोणतेही वचन देण्याआधी सदर योजनेच्या चांगल्या वाईट बाबी तपासून पाहा, वाटेवरून चालताना वाटेसारख वागावे लागते. आपण कितीही सरळ असली तरी वळणावरून वळावच लागतं, स्पर्धात्मक परीक्षेला बसणाऱ्यांनी शांत मनाने सामोरे जावे. स्वतःचे यश मोठे करून सांगू नये, आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून ध्या.

सत्याची कास धरा व पुढचा मार्ग स्वीकारा म्हणजे यशाचा मार्ग सुलभ होईल. बोलताना जिभेला लगाम घाला. आपले धोरण अधिकाधिक सहनशील ठेवण्याची गरज आहे.

कौटुंबिक जबाबदान्या स्वतःहुन पार पाडण्याची संधी लाभेल. कौटुंबिक स्वास्थासाठी ज्येष्ठांचे मार्गदर्शन घ्या. कौटुंबिक सौख्य बिघडविणान्या बाबी टाळण्याचा प्रयत्न करा.

घरात चांगले वातावरण निर्माण होण्यासाठी एखादा कार्यक्रम आयोजित करा. प्रेमी युगुलांना मनासारखे निर्णय घेण्यास संधी मिळेल. एक दुसऱ्यांच्या मतास प्राधान्य द्या.

पती-पत्नीनी प्रयत्नपूर्वक एक दुसऱ्यांच्या आवडी निवडी जपाव्यात. अहंकारास फार महत्त्व देऊ नका. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांचा प्रश्न सुटेल. स्वतःची कामे शक्यतो स्वतः वेळेवर करा.

नोकरीत कर्तव्याचे पालन करा. इतरांना सुधारणा करण्यासंबंधी उपदेश देत बसू नये. व्यवसायाच्या क्षेत्रात प्रगतीसाठी तडजोडीची वृत्ती स्वीकारावी लागेल. व्यवसाय क्षेत्रात व व्यवहारात कोणावरही अवलंबुन राहु नका.

ज्या ज्या वेळी अभ्यासात प्रयत्न करून मानसिक स्थिती सुधारत नसेल त्या त्यावेळी मैदानी खेळात रस घ्यावा. विद्यार्थ्यांना परीक्षेत सुयश मिळवण्यासाठी थोडे अधिक श्रम करावे लागतील.

आत्मविश्वास वाढवा व स्वत:च्या कर्तृत्वाला अधिक बळकटी आणा. विनाकारण भविष्याची चिंता करण्यात वेळ घालविण्याऐवजी वर्तमानाची मज्जा घेण्यात खरा आनंद आहे हे पक्क ध्यानात ठेवा.

Libra/तूळ Tula Rashi in Marathi October 2022

Libra/तूळ Tula Rashi in Marathi

Tula Rashi Kalnirnay Rashi Bhavishya

Tula Rashi October 2022 in marathi

रवि-बुध-शुक्र-केतु प्रथम, शनि – प्लुटो चतुर्थ, नेपच्यून पंचम, गुरु षष्ठ, राहु-हर्षल सप्तम, मंगळ अष्टम, मंगळ नवम, रवि-बुध शुक्र व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत. शरीराच्या स्वच्छतेकडे जास्त लक्ष द्यावे.

पायऱ्या उतरताना जास्त दक्ष राहावे. आरोग्यविषयक जोखीम घेऊ नये. आपल्या शक्तीच्या बाहेर उलाढाल्या करू नका. वजन वाढवून घेऊ नका. साधा पौष्टिक, चौरस आहार व नियमित व्यायामाने प्रकृती स्वास्थ्य उत्तम राखता येईल.

कर्जप्रकरणे करताना आर्थिक नियोजनांचे भान ठेवावे लागेल. खरेदी-विक्रीच्या मोहात पडू नका. खर्च काटकसरीने केल्यास चिंता करावी लागणार नाही. कुटूंबात आनंदी वातावरण राखण्यासाठी प्रयत्नशील राहा.

कुटूंबातील वडीलधाऱ्या व्यक्तींचा मानसन्मान ठेवा. भावनांच्या आहारी जाऊ नका. आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर टाकू नका. सर्वांच्या आनंदासाठी खास बेत आखा.

अभ्यासातील प्रगतीसाठी ज्येष्ठांच्या सल्ल्याने अभ्यासाचे वेळापत्रक आखा. अभ्यासातील मर्म शिका. अभ्यासातील सातत्यात अथक परिश्रम अपेक्षित आहेत हे विसरू नका.

खेळण्या बागडण्यात वेळेचा अपव्यय करू नका. प्रेमप्रकरणात वाहवत जाऊ नका. तुमच्या जोडीदाराबरोबर मिळतेजुळते घेणे जरूरीचे आहे. एक दुसऱ्यांसाठी वेळ काढा.

वैवाहिक जोडीदारास समाधान देण्यात तत्पर राहा. जीवनसाथीचा विश्वा संपादन करा. वैवाहिक सौख्याबद्दल आलेल्या अडचणींवर सामोपचाराने मार्ग काढा. सतत बदलणाऱ्या परिस्थितीचे भान राखून व्यवसायांचे नियोजन करा.

व्यावसायिकांनी धंदा कसा वाढेल याचा विचार करून तसे करार करावेत. नोकरीत कष्ट जाणवतील. नोकरीत थोडी तणावाची परिस्थिती राहील. नोकरीत बदल जरूर असावा परंतु त्यात स्थैर्य नसल्यास पश्चात्तापाची पाळी येईल. इतरांच्या बहकवण्याला भुलू नका.

सहजतेने कोणालाही विश्वास ठेवू नका. थोडा वेळ स्वत:साठीही काढा.

Scorpio/वृश्चिक Vruchik Rashi in Marathi October 2022

Scorpio/वृश्चिक Vruchik Rashi in Marathi - scorpio sign in marathi

Vruchik Rashi Kalnirnay Rashi Bhavishya

Vruchik Rashi October 2022 in Marathi

शनि – प्लुटो पराक्रम, नेपच्यून चतुर्थ, गुरु पंचम, राहु-हर्षल षष्ठ, मंगळ सप्तम, मंगळ अष्टम, रवि-बुध-शुक्र लाभ, रवि-बुध-शुक्र केतु व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत.

कोणत्याही स्थितीचा सकारात्मकतेने सामना करा. सर्वप्रथम आत्मविश्वास बाळगा आणि इतरांकडून अपेक्षा कमी ठेवा. इतरांकडून अवाजवी अपेक्षा बाळगणे, हेच तुमच्या दुःखाचे कारण आहे.

तुम्ही सारे करू शकता हा विश्वास बाळगा. आरोग्य राखण्यासाठी कामामधून वेळ काढा व व्याधी निवारण करा. शारीरिक वेदनांपासून स्वत:चा बचाव करावयास हवा. गरज वाटल्यास डॉक्टर बदलण्याबाबत हलगर्जीपणा करू नका.

जुन्या वसुलीतून वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. चंचल स्वभावाला आवर घाला. कोणतीही जोखीम पत्करू नका. खर्चापेक्षा बचतीकडे कल वाढवावा लागेल.

मरगळ झटकून अर्थार्जन कसे होईल याचा विचार करा. भावंडांशी वागताना जपून वागावे लागेल अन्यथा गैरसमज निर्माण होतील. गैरमार्गाने जाणाऱ्या मुलांना वेळीच रोखण्याची जबाबदारी पालकांची आहे हे ध्यानात ठेवा.

संततीच्या चुका त्यांच्या नजरेला आणून देणे आवश्यक ठरेल. प्रेमसंबंधात गैरसमज होणार नाही याची काळजी घ्या. प्रेमसंबंधात भावनांचा अतिरेक होता कामा नये.

प्रेमसंबंधातील आपुलकी वाढविण्यासाठी जोडीदाराला फिरायला न्या. वैवाहिक जीवनातील कर्तव्य पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा लागेल. वैवाहिक सौख्य वृद्धिंगत करण्यासाठी घरातील वरिष्ठांचे मार्गदर्शन घ्या.

नोकरीतील धरसोड वृत्ती सोडून द्या. नोकरीत अशामुळे स्थिरता राहत नाही अशा वृत्तीने आर्थिक उत्पन्नावर परिणाम होतो. व्यवसायात चैतन्य आणण्याचा प्रयत्न करा. आपल्या व्यवसायातील स्पर्धकांवर बारीक लक्ष ठेवावे लागेल.

See also  Mahalaxmi 2024 March Calendar Marathi

नियोजन करून मोठे प्रकल्प हाताळल्यास त्यात अपेक्षित यश मिळेल. जर कुठल्याही कठीण परिस्थितीवर तुमचे चांगले नियंत्रण असेल, तर विष ओकणारे सुद्धा तुमचं काही बिघडवू शकत नाहीत,

Sagittarius/धनु Dhanu Rashi in Marathi October 2022

Sagittarius/धनु Dhanu Rashi in Marathi

Dhanu Rashi Kalnirnay Rashi Bhavishya

Dhanu Rashi October 2022 in Marathi

शनि – प्लुटो द्वितीय, नेपच्यून पराक्रम, गुरु चतुर्थ, राहु-हर्षल पंचम, मंगळ षष्ठ, मंगळ सप्तम, रवि-बुध-शुक्र दशम, रवि-बुध शुक्र-केतु लाभस्थानातून भ्रमण करणार आहेत.

निर्माण झालेल्या प्रश्नावर शांतपणाने विचार करून मार्ग शोधा. प्रत्येक गोष्टींचा आस्वाद घेताना त्याचा अतिरेक होणार नाही ना याची काळजी घ्या. जे आपली परिस्थिती समजू शकतात आणि गरज ओळखू शकतात अशा जवळच्या मित्राबरोबर बाहेर फिरायला जा.

मालमत्तेच्या संरक्षणाची तरदूत करण्यात हयगय करू नका. छुपे शत्रू टपूनच बसले आहेत, याचे भान असू द्या. योग्य विचारांनीच कृती करा. झालेल्या आजारांने खेचून जावू नका, त्यावर योग्य ते उपचार करावेत.

रात्री हलका आहार घेणे आरोग्यास हितकारक असते. आर्थिक व्यवहारातील पकड सैल होणार नाही याची दक्षता घ्या. खर्चाचा ताळमेळ राखावयास हवा. लांब मुदतीच्या ठेवीसाठी अर्थतज्ज्ञांचे मत घेणे हितावह आहे.

नात्यात उधार उसनवार करणे टाळावयास हवे. स्वत:हून ठरवून घेतलेले शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा. आपले प्रयत्न चुकीच्या दिशेने चालू राहणार नाहीत याची दक्षता घ्या.

शिक्षणानिमित्त परदेशी दूर सहलीचे योग आहेत. घरातील माणसांची मने सांभाळा. घरातील माणसांकडून जास्त अपेक्षा बाळगू नका. राग आला तरी अनपेक्षितपणे रागावून नातेसंबंध तोडू नका.

कुटूंबात ताणतणावाचे वातावरण अनाठायी निर्माण करू नका. विद्यार्थी वर्गाने लक्ष विचलित न होण्यासाठी योग व ओंकारसाधना करावी. गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास केल्यास उत्तम यश लाभेल.

नवीन नोकरीच्या प्रयत्नास यश मिळणे कठिण होईल. असलेल्या नोकरीत समाधान मानून राहा. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. ताण व तणाव वाढण्याची शक्यता आहे. व्यवसाय वृद्धिच्या प्रयत्नात सातत्य ठेवा. आत्मविश्वास वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करा. आपल्या व्यवहारातील खाचखळगे ओळखा.

Capricorn/मकर Makar Rashi in Marathi October 2022

Capricorn/मकर Makar Rashi in Marathi

Makar Rashi Kalnirnay Rashi Bhavishya

Makar Rashi October 2022 in Marathi

शनि – प्लुटो प्रथम, नेपच्यून द्वितीय, गुरू पराक्रम, राहु-हर्षल चतुर्थ, मंगळ पंचम, मंगळ षष्ठ, रवि-बुध-शुक्र नवम, रवि-बुध शुक्र-केतु दशमस्थानातून भ्रमण करणार आहेत. आरोग्याची पूर्ण काळजी घ्यावी.

थोडयाफार अडचणी येतील पण आपण त्यावर उत्तम मात करू शकाल. आपली संरक्षणाची बाजू मजबूत करा. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. जिभेवर नियंत्रण ठेवावे.

कौटुंबिक वादाला कारणीभूत होणारे विषय टाळणे गरजेचे आहे, कौटुंबिक जीवनातील आपल्या जबाबदान्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. कुटूंबातील वडिलधाऱ्या व्यक्तींचा मानसन्मान राखा, आपली आर्थिक घडी व्यवस्थित बसवायचा प्रयत्न करा.

आर्थिक लाभाचा आलेख उंचावण्याची संधी मिळेल. आर्थिक समतोल राखण्यासाठी बचत करण्याचा प्रयत्न करा. बुद्धीचातुर्याची अर्थार्जनाला जोड द्या. आपल्या अभ्यासशैलीत आवश्यक तो सुधार करा.

विद्यार्थ्यांनी आळस न ठेवता मेहनत केल्यास लाभ होईल. मनाची एकाग्रता, सातत्य व संयम राखा, जोडीदाराच्या प्रेमाबद्दल परिक्षा पाहु नका अडचणीत याल. प्रेमातील तणाव टाळण्याचा प्रयत्न करणे दोघांच्या हिताचे आहे.

पती-पत्नीनी एकमेकांच्या आवडी निवडीकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी कुठल्याही खाजगी गोष्टी लपवू नका. नोकरीतील प्रगती लाभदायक होईल. विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या स्विकारण्याची तयारी ठेवावी लागेल.

नोकरीत स्थिरता व समाधान प्राप्त होईल. वरिष्ठांच्या मदतीने पेच सोडवाल. व्यवसाय क्षेत्रात योग्य अशी संधी मिळेल, व्यवसायातील निर्णय जोडीदाराच्या विचाराने घ्या. व्यवहारात नियमांचे काटेकोर पालन करा. व्यवसायात तडजोडीचे धोरण ठेवा.

एखादी कला शिकून घ्या. तुमच्या मनात जी कामे करायची आहेत ती लागलीच सुरू करा. तुमच्या मनातील गोष्टी उघड करताना योग्य व्यक्तीची निवड करा. शत्रूचा पराभव सहज करू शकाल. अहंकारामुळे हसू करून घेऊ नका.

Aquarius/कुंभ Kumbha Rashi in Marathi October 2022

Aquarius/कुंभ Kumbha Rashi in Marathi - aquarius in marathi zodiac sign

Kumbha Rashi Kalnirnay Rashi Bhavishya

Kumbha Rashi October 2022 in Marathi

चंद्र-नेपच्यून प्रथम, चंद्र-गुरू द्वितीय, राहु-हर्षल पराक्रम, मंगळ चतुर्थ, रवि-बुध-शुक्र अष्टम, केतु नवम, चंद्र लाभ, चंद्र-शनि प्लुटो व्ययस्थानी असे ग्रहमान असतील, प्रवास जपून करावेत, प्रवासकाळात आपल्या वस्तूंची काळजी घ्या.

आत्मविश्वास वृद्धिंगत कसा होईल याबद्दल प्रयत्नशील राहा. इतरांना मदतीच्या भानगडीत पडू नये, स्वतःच्या वागण्या बोलण्यातून चूकीचे संदेश जाणार नाहीत याची काळजी घ्यावी, कर्ज प्रकरणातून कोणास जामीन राहणे धोकादायक आहे.

धनसंचय करण्याच्या प्रयत्नात राहा, ऐकीव बातम्यावर विश्वास ठेवू नका, चिंती परा ते येई घरा म्हणून शुभ चिंता, परदेश व्यवहारातून लाभ होतील. परंतु निषिद्ध गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात.

बाहेरील अन्नपदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा, नौकरीत आपणास उत्तम यश मिळेल. झेपतील अशाच जबाबदाऱ्या घ्या, व्यवसायातील सातत्य टिकवा, व्यापारात वृद्धीसाठी जाहीरातीचा उपयोग करा.

जीवनात कोणत्याही पळवाटीचा अवलंब सध्या तरी करू नका, वडिलधान्यांशी वाद नकोत, भावनेच्या आहारी जाऊ नये. स्वतःची आत्मप्रौढी मिरवणे टाळावे.

Pisces/मीन Meen Rashi in Marathi October 2022

pisces sign in marathi

Meen Rashi Kalnirnay Rashi Bhavishya

Meen Rashi October 2022 Marathi

गुरु प्रथम, राहु-हर्षल द्वितीय, मंगळ पराक्रम, मंगळ चतुर्थ, रवि-बुध-शुक्र सप्तम, रवि-बुध-शुक्र-केतु अष्टम, शनि-प्लुटो लाभ, नेपच्यून व्ययस्थानातून भ्रमण करणार आहेत.

तुमच्या जीवनाला एक चांगला छान ताल येऊ द्या, त्यागाची आत्मसर्मपणाची किंमत जाणून घ्या. ज्यावर उपाय करता येत नाही ते शांतपणे सहन करावे. जे दुसऱ्यांना मदत करतात त्यांना देवही मदत करतो हे विसरून चालणार नाही.

आपल्या कुवतीप्रमाणे सर्वांना आपलेसे करा. कोण कोणाला कधी कामाला येईल हे सांगता येणार नाही. इतरांच्या मनात प्रेरणेची ऊर्जा निर्माण करण्यात पुढाकार घ्या. खुल्या दिलाने नवीन ओळखी करून घ्या.

सकस व सात्विक आहारावर भर द्या. आरोग्यासाठी कोणतीही तडजोड न करता व्यायाम अथवा योगसाधना केल्याने आरोग्य उत्तम राखता येईल. कोणत्याही कागदपत्रावर पूर्ण विचार करूनच सही करावी.

आर्थिक घडी व्यवस्थित बसविण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आर्थिक समतोल राखण्यासाठी बचत करण्याचा प्रयत्न करावा. आपल्या आकलन शक्तीचा विकास करा. स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवा.

प्रेमसंबंधात तणाव आणू नका. परस्परांच्या स्वातंत्र्याचा योग्य मान राखा. आपल्या वैवाहिक जोडीदारास समाधान देण्यात तत्पर राहा. वैवाहिक सौख्य टिकवून ठेवा. समस्या कशा दूर करता येतील याकडे लक्ष केंद्रीत करा.

नोकरीत कामाची जबाबदारी वाढेल. न पेलणाऱ्या योजनांच्या मागे धावू नका. तुमच्या शक्ती बाहेरची कामे तुम्हाला करावी लागतील.

धंदा व्यवसायाच्या विस्तारांसाठी प्रयत्नशील राहा. व्यवसायात चैतन्य आणण्याचा प्रयत्न करा.

अनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका.

एक लक्षात ठेवा वादविवाद चर्चामधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतेच. सामाजिक जीवन कधीही विसरू नये, समाजाप्रति आपले असलेले कर्तव्य पूर्ण करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *